राज्यात कोरोनाचा तांडव,२४ तासात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ…..

मुंबई, दि. २३ जुलै २०२०: महाराष्ट्रात कोरोनाचा विळख्या वाढत चालला असून कोरोना रुग्ण वाढीचा उच्चांक हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात काल कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर आज ५ हजार५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ आले आहे. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. अशी माहिती देखील त्यांनी दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा