गोल पोस्ट राजकारण कोरोना रूग्ण आढळल्यामुळे गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन, दिला गावकऱ्यांना आधार.

कोरोना रूग्ण आढळल्यामुळे गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन, दिला गावकऱ्यांना आधार.

उस्मानाबाद, २९ जून २०२० : उस्मानाबाद जिल्ह्यातील काटगाव तालुका तुळजापूर येथे कोरोना ग्रस्त रूग्ण आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली. या परिस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज दिनांक २९ जून रोजी गावास भेट देऊन, सध्यस्थितीचा आढावा घेतला.

गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आधार दिला. प्रतिबंधित क्षेत्रात खत, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर त्वरित उपलब्ध करावेत, या सोबतच वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क राहावे अशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या. तसेच, ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांना केले.

यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत सिंह, मरोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

error: Content is protected !!
Exit mobile version