कोरोनाच्या भीतीने बाजारपेठेत शुकशुकाट

बारामती शहरात कोरोना व्हायरसच्या भीतीने खबरदारी म्हणून नागरिक आवश्यक कारणासाठीच बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या शहरात सगळीकडे मुख्य बाजारपेठेत देखील शुकशुकाट पहावयास मिळत आहे.

बारामती शहारत कोरोना व्हायरस मुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.पुढच्या महिन्यात लग्न सराई असताना व रोजच्या गरजेच्या लागणाऱ्या खरेदीसाठी देखील लोक येण्याचे टाळत आहेत.त्यामुळे बाजारपेठेत दुकानात दुकानदार निवांत बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.तर शहरातील प्रसिद्ध,सिद्धेश्वर मंदिर,गणपती मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.तर स्वामी समर्थ मठ यांनी २६ तारखेला असणारा स्वामी स्मार्ट प्रकट दिनाचा कार्यक्रम रद्द केला असून ३१ मार्च पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले
आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे नगर पालिका हद्दीतील सर्व शाळांना १६ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सुट्टी दिली आहे.१८ मार्च पासून बऱ्याच शाळांच्या परीक्षा सुरू होणार होत्या मात्र कोरोना व्हायरस या साथी पासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले असून किराणा मालासारख्या जीवनावश्यक दुकानदार देखील निवांत बसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.रुग्णालयातील स्तिथी पाहता कोरोना व्हारासाच्या सर्दी व खोकला असणारे नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे.मात्र शहरातील रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्यांपासून सगळे मास्क किंवा रुमाल।बांधून कोरोना व्हायरस पासून खबरदारी घेत असल्याचे पाठवायला मिळत आहे.भाजी मंडई, शीतपेय गृह, हॉटेल सगळीकडे शांतता पाहायला मिळत आहे.

मांसाहारातून कोरोना व्हायरस पसरत असल्याची अफवा पसरत असल्याने हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. तसेच शासनाने प्रवास टाळावा असे आवाहन केल्याने देखील बाहेरगावाचे येणारे ग्राहक नसल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.- रणजित जाधव


कोरोना व्हायरसचा धास्तीने जीवनावश्यक असणाऱ्या किराणा माल घेण्यासाठी देखील लोक येत नाहीत तर कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव वाढेल या भीतीने काही लोकांनी दोन,तीन महिन्यांचा किराणा माल घरी नेला आहे.- सचिन गादीया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा