चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतील १२० कामगारांना कोरोनाची बाधा.

राजगुरूनगर, दि. २ ऑगस्ट २०२० : खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील एका नामवंत कंपनीतील १२० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने औद्योगिक वसाहतीत खळबळ पसरली आहे. कंपनी व परिसर कंन्टेमेंट झोन मध्ये परावर्तीत करण्यात येऊन आरोग्य विभागाने कंपनी परिसरात आज पहाणी केली

खेड तालुक्यात १३७१ रुग्णांची नोंद झाली असुन ८६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
चाकण औद्योगिक वसाहत व राजगुरुनगर, चाकण आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यात अपयश येत असल्याने पुढील काळात कोरोनाच्या संसर्गाचे हे वाढते जाळे धोक्याची घंटाच आहे.

चाकण औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनी मधील १२० जणांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आले असताना कंपनी मधील ८०० जणांचे स्वैब तपासणी केली होती. त्यापैकी १२० जण हे पॉझिटिव्ह आले आहेत , कंपनी बंद करण्यास व्यवस्थापकांना सांगण्यात आले असून कंपनी मध्ये कोणत्याही नियमाचे पालन न केल्याने अनेकांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे ,गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली.

प्रतिनिधी – सुनिल थिगळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा