दोन दिवसांत चार नेत्यांना कोरोना तर राज्यासाठी एक दिलासादायक गोष्ट…

मुंबई, २० फेब्रुवरी २०२१: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, दिवसेंदिवस नव्या कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी तर हि संख्या सहा हजारांच्या घरात पोहचली आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा या भागात मुंबई पेक्षा ही जास्त प्रमाणात विषाणूचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. ज्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली होती.

अमरावती, यवतमाळ, वर्धा मधे सापडलेले नवे कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. हे रूग्ण ब्राझील, आफ्रिका येथील कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचा तर शिरकाव महाराष्ट्रात झाला नाही ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, त्यामधेच दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही नव्या प्रकारच्या कोरोनाचा शिरकाव झाला नाही.

वाढत्या कोरोनाच्या उद्रेकात मंत्री सापडले…..

राज्यात एकीकडे कोरोना रूग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत चार मंत्र्यांचे कोरोना रिपोर्ट पाॅजिटिव्ह आढळले आहेत. यामधे आरोग्य मंत्री राजेश टोपे,जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू तसेच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे, भाजपा नेत्या रक्षा खडसे यांचा समावेश आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्वांरनटाइन आहे.

सर्व नेत्यांची प्रकृती स्थिर आसून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे. तर राज्यात ९ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत दहा हजारांनी कोरोना रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट झाल आहे. पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात १,००० वर रूग्ण संख्या गेली. तर मुंबईत काल ८५३ नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा