पुणे, दि. ३ जुलै २०२०: जगात कोरोनाचा तांडव सुरू आहे तर संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनाच्या लसी कडे लागले आहे. तर आनेक देश लसीवर संशोधन करत आसून त्यांची चाचणी अंतिम टप्प्याजवळ येऊन ठेपली आहे. तर भारत मात्र पुन्हा जगात मानचा तुरा रोवण्यासाठी सज्ज आहे. ICMR आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नातून कोरोना प्रतिबंध लस हि अंतिम टप्प्यात पोहचली आसून महासंचालक बलराम भार्गव यांनी निवेदनाद्वारे हि माहीती दिली आहे.
कोरोना प्रतिबंध लस हि भारतात शेवटच्या टप्प्यात आली आहे. ७ जुलैपासून मानवी चाचणी करण्यास ICMR ने परवानगी दिली आहे.
ICMR आणि भारत बायोटेक यांचा हा संयुक्त प्रयत्न आसून पुण्याच्या एनआयाव्हीचा ही मोठा सहभाग आहे. तसेच महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले की आम्ही कोरोना प्रतिबंध लसीच्या अंतिम टप्यात आहोत आणि येत्या १५ ऑगस्ट पर्यंत हि लस लोकांसाठी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. या चाचणी मध्ये कुठल्याही पद्धतीची घाई नसून केंद्राच्या उच्च स्थानावरुन यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी