कोरोना विषाणु हंगामी नाही, पुढे परिस्थिती अजूनही भयावह: WHO

नवी दिल्ली, १२ ऑगस्ट २०२०: जगभरात कोरोनाचा व्हायरसचा हाहाकार चालूच सुरूच असून आतापर्यंत १ कोटी ९७ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, ७ लाख २८ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत सध्या १ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे कोरोना प्रमुख डॉ. मारिया व्हॅन केरखॉव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की कोरोना हा हंगामी विषाणू असल्याचे कोणतेही संकेत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी लोकांना शक्य ते सर्व करण्याचा सल्ला दिले.

भारतातही कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहे. तर आता कोरोनाबाबत एक नवा इशारा देण्यात आहे. कोरोना व्हायरस हा अजूनही फिरत आहे आणि आणखी लोकांना या व्हायरसची लागण होऊ शकते.

भारतात टेस्टिंगवर आहे भर

भारतात कोरोनाला रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग केल्या जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या काही आठवड्यात रोज १० लाख टेस्ट करण्याचे लक्ष ठेवले आहे. जेणेकरून भारतातील वाढत्या रुग्णांची संख्या कमी करता येईल. देशात सध्या २२ लाख १५ हजार ०७४ कोरोना रुग्ण आहेत. तर, ४४ हजार ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.

यावरुन स्पष्ट होते की कोरोना व्हायरस अजुनही मोठ्या प्रमाणात घातक ठरु शकतो. तर तो कुठल्याही हंगामात नष्ट होणारा विषाणु नाही. त्यामुळे जनमाणसांनी जेव्हा ही बाहेर पडले असता सरकारच्या सर्व नियमांचे पालन केले तर याला आपण आधिक काळ स्वतापासून लांब ठेवू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा