कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनच्या ५ शहरांमध्ये प्रवास बंदी

चीन : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये हाहाकार माजला आहे. तसेच या विषाणूंमुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यु, तर जवळपास ८०० जणांना या विषाणूंची लागण झाली आहे.
या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून चीनमधील ५ शहरांमध्ये प्रवास बंदी करण्यात आली आहे. वुहानमधील रेल्वे आणि विमान सेवा बेमुदत काळासाठी बंद करण्यात आली असून शहराबाहेरच्या रस्त्यांवरील टोल वे बंद करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहे. या दोन्ही रुग्णांना सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा