राज्यातील कोरोना लाट ओसरतीय पण ग्रामीण भागात

मुंबई, २९ मे २०२१: राज्यात आता हळूहळू कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत आहे. रुग्ण संख्येमध्ये ही होत असलेली घट कायम दिसून येते. ज्या मुळे राज्यातील जनतेमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. तर प्रशासनाच्या लागू केलेल्या निर्बंधाचे सकारात्मक परिणाम आता राज्याला दिसून आलेत. तर २८ तारखेला ही राज्यातील नव्या रुग्णवाढीच्या संख्येत घट पहायला मिळाली.
२८ तारखेला राज्यात २४ तासात २० हजार ७४० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर ४२४ जणांचा या विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला. कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये ही सातत्याने वाढ होताना दिसतेय गेल्या २४ तासात ३१,७७१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्याच्या सरकार समोर कोरोना मृत्यूच्या आकड्याबाबत चिंता कायम असल्याचे दिसले.
राज्यातील शहरी भागात कोरोना ची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. तर राज्यातील अनेक ग्रामीण भागात ही परिस्थिती जैसें थे आसल्याची माहिती आहे. तर ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर याचा भार पडतोय. ज्यामुळे तेथील आरोग्य सेवा कोलमडून पडली आहे. ग्रामीण भागातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार समोर अजून ही कोडे कायम आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा