कोरोनामुळे गणपती कार्यशाळांना बसणार फटका

ठाणे, दि. २४ जुलै २०२०: गणपती म्हंटल की लहानापासून मोठ्यापर्यंत एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो. त्यात गणपती मंडळ हे अगदी अग्रेसर असतात आणि याच सणात नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि त्याचाच फायदा होतो तो गणपती कार्यशाळांना. मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारीचा फटका हा गणपती कार्यशाळांना बसला आहे.

दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून नोंदणी होत असते. मात्र, श्रावण महिना चालू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मुर्त्यांची नोंदणीच झालीच नाही. याच महामारीचा फटका ठाण्यातील एका दिव्यांग गणेश कार्यशाळा चालकाला बसला आहे. तयार अर्ध्या अधिक मुर्त्या शिल्लक राहिल्या, तर त्याला यामुळे प्रचंड अशा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

जून महिन्यापर्यंत साधारणत: २५० गणेशमुर्त्यांची आगाऊ नोंदणी होत असते. गणेशोत्सवाला महिनाही राहिलेला नाही. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे या वर्षी १५० गणेश मुर्त्यांचेही आगाऊ बुकिंग झालेले नाही, असे कार्यशाळा चालकांनी सांगितले. मात्र या कोरोनाच्या महामारीत महागाई सुद्धा दुप्पटीने वाढली आहे. त्यामुळे मुर्त्यांच्या किंमतीसुद्धा वाढल्याने नागरिकांचा मुर्ती खरेदीकडे कल कमी होत आहे आणि दरवर्षीपेक्षा किमती जास्त असल्याने त्या आवाक्याबाहेर जात असल्याचे ग्राहकांचे मत आहे.

गणपती कार्यशाळामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे तसेत रंगरंगोटी करणाऱ्या कलाकारांचे हातचे काम गेल्याने त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि तयार मुर्त्या सूद्धा पडून असल्याने कार्यशाळा चालकांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा