आज जगभरात कोरोनाचा जो उद्रेक झाला आहे तो कोरोना विषाणू आला कोठून याची छेड काढली कोणी या बद्दल आज जगात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत, पण या गोष्टीच्या मुळाशी आज जाण्याचा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. जो-तो या गोष्टीवर लस शोधून काढण्याच्या मागे लागलेला दिसत आहे. आजपर्यंत या विषाणूने जगभरातील १५० हुन अधिक देशात आपली पाळे मुळे घट्ट रोवली आहेत.या विषाणूमुळे जगात लोक भयभीत जीवन व्यतीत करत आहेत. पण हा विषाणू मानवापर्यंत आला कसा ? जगामध्ये आरोग्याच्या सोई सूविधा उच्च दर्जाच्या आहेत त्या अमेरिकेला सर्वात जास्त विळखा या विषाणूने घातला आहे.
आजच्या घडीला अमेरिकेत अमेरिकेच्या अधिकृत आकडेवारी नुसार जवळ जवळ १० लाख रुग्ण अमेरिकेत आहेत, आणि ५६ हजार मृत्यू झाले आहेत. ज्या अमेरिकेला इस्राईलच्या युद्धात पण एवढी हानी झाली नव्हती तेवढी हानी या कोरोनामुळे झाली. मग इतक्या शांतपणे चीनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फक्त इशारे देत आहे! या पाठीमागची गणिते उलगडण्याचा प्रयत्न केला तर…
आता जे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोग्य सल्लागार डॉ.अँनथनी फॉसि यांनी चीनच्या हुआन प्रयोग शाळेस (हुआन इन्स्टिट्यूट्स ऑफ व्हायरॉलॉजि) अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट्स फॉर ऍलर्जी अँड इन्फेकशन डिसीजेस या संस्थेने ३७ लाख डॉलर्स चा निधी डॉ. फॉसि यांनी त्या संस्थेचे प्रमुख या नात्याने निधी बहाल करण्याची अनुमती दिली गेली होती,असे वृत्त अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील नियतकालिकेने दिले आहे. या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या विषाणूचा अभ्यास केला जातो तसेच हा विषाणू वेगळा करून त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याचा प्रयोग या प्रयोगशाळेत कारत होते. याचा अर्थ असा होतो की अमेरिकेने फंड दिला गेला असल्याच्या कारणाने अमेरिकेने प्रयोगशाळेस काही नियम व अटी दिल्या असणार व त्यानुसारच वुहान शहरातील त्या कथित प्रयोगशाळेत काम चालू असणार, किंबहुना त्यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते कि नाही हे अमेरिका नक्कीच पाहण्यासाठी आपल्याही काही शास्त्रज्ञांना तिथे नियुक्त केलेले असणार यात तिळमात्र पण शंका असणार नाही. नाहीतर फक्त चीनच्या विश्वासावर इतका मोठा निधी अमेरिका तिथे गुंतवणूक करूच शकणार नाही.
सुरवातीस अमेरिकेतील गुप्तचर संघटनेने ही आपत्ती मानवनिर्मित नसून नैसर्गिक असल्याचे सांगितले होते या बाबतीत अमेरिकेचे राष्ट्रीय सल्लागार डॉ. फॉसि यांना न्यूजवीक ने विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे.
या कामाचा पहिला टप्पा हा २०१४ मध्ये सुरु झाला होता त्यामध्ये वटवाघुळातील ‘कोरोना’ विषाणू हा एक भाग होता या प्रयोगशाळेत या प्रयोगासाठी प्रमुख म्हणून विषाणू शास्त्रज्ञ शी झेंग ली हे करत होते. कोरोना विषाणू हा एक अभ्यासाचा भाग होता हा किंबहुना वटवाघळातील कोरोना विषाणूची सूची करण्यात येत होती, या संशोधनाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये पूर्ण ही झाला होता.
दुसऱ्या टप्प्यात गेल्या वर्षी वटवाघळातील विषाणू वेगळा करून माणसात कसा संसर्ग घडवुन आणतात या बाबत संशोधन करण्यासाठी हा विषय संशोधन करण्यात आला होता.
या बाबतीत रुटगर्ट्स विद्यापीठाचे रिचर्ड एब्राईट यांनी सांगितले की या संशोधनाचे स्वरूप पहिले तर यात वटवाघळातील कोरोना विषाणूचा मानवाला संसर्ग करण्याची क्षमता ही वाढवण्यात अली होती, त्यासाठी जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. हे इतके प्रकार गेली ४/५ वर्षे चाललेले संशोधन त्याचा परिणाम,व्याप्ती ज्यांनी फंड दिला त्यांना अंधारात ठेऊन केला गेला हेच हास्यास्पद ठरेल.
वटवाघूळ त्याचे जीवन जगात होता त्याला दोषारोप करून चालणार नाही, तर त्याच्या जनुकीय गोष्टीवर फेरफार करून आता आपण एखादा देश न म्हणता आपण मानव म्हणून कोणती गोष्ट सध्या करणार होतो, पण अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने हा विषाणू कोणत्याही प्रयोगशाळेत तयार झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत असे ठामपणे सांगितले आहे. की वन्यजीवातून बरेच जीवाणू मानवात येतात त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, जैव सुरक्षेला मोठा धोका होतो जसे कोविड १९ हा त्यातलाच एक प्रकार आहे.
या सर्व गोष्टींवरून आपल्याला ठरवावे लागेल की कोरोनाचा जनक कोण वटवाघूळ की मानव ….
– अशोक कांबळे