पतंजली ने बनवले कोरोनावर कोरोनील औषध, पुढील सात दिवसात उपलब्ध

नवी दिल्ली, दि. २३ जून २०२० : कोरोना विषाणूच्या साथीने पूर्णाच्या त्रासलेले आहेत. परंतू आत्तापर्यंत यावर कोणतेही औषध शोधले गेलेले नाही. आता योग गुरु रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीने असा दावा केला आहे की या विषाणू वर मात करण्यासाठी त्यांनी प्रभावी औषध बनविले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत बाबा रामदेव म्हणाले की जग कोरोना विषाणूची काही औषधे बाहेर येण्याची वाट पहात होता , पण आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही कोरोना विषाणूचे पहिले आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. या आयुर्वेदिक औषधाचे नाव कोरोनील आहे.

रामदेव बाबा म्हणाले की आज ॲलोपॅथीक प्रणाली मेडिकल विश्वामध्ये आपला वेगळा ठसा उमटवत आहे. यावर आधारित आम्ही कोरोनिल हे औषध बनवले आहे. ज्यामध्ये आम्ही क्लिनिकल कंट्रोल स्टडी करत आहोत, ह्या औषधाची चाचणी आत्तापर्यंत शंभर लोकांवर घेण्यात आली आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर या औषधाच्या सहाय्याने बाधित रुग्ण बरे झाल्याचे रामदेवबाबा यांनी सांगितले. या औषधांमुळे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, सातत्याने या औषधाचा सात दिवस वापर केल्यावर चाचणी मध्ये सहभागी झालेले शंभर टक्के रुग्ण बरे झाले. आमच्या औषधात शंभर टक्के रिकव्हरी दर आणि शून्य टक्के मृत्यू दर आहे. रामदेव म्हणाले की, लोक आता या औषधावर आमच्यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात करतील. परंतू या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्याकडे आहेत. आम्ही पूर्ण वैज्ञानिक मार्गाने हे औषध बनवले आहे.

पुढील सात दिवसात उपलब्ध

रामदेव बाबांनी औषधांबाबत बोलताना असे सांगितले की पुढील सात दिवसात हे औषध पतंजलीच्या स्टोरमध्ये विक्रीस उपलब्ध असेल. याच बरोबर त्यांनी एक ॲप देखील तयार केले आहे या ॲपच्या माध्यमातून हे औषध थेट लोकांच्या दारापर्यंत पोहोचवले जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा