नवी दिल्ली (वृत्तसंस्था), दि.८ मे २०२०: अमेरिकेतील व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात एकाच खळबळ उडाल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. त्यांच्या खासगी नोकराला कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना झालेली व्यक्ती ही अमेरिकेच्या नौदलातील व्यक्ती आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष या दोघांचाही त्या संबंधित कर्मचार्यांशी जवळचा संपर्क नव्हता असे व्हाईट हाऊसने आज (शुक्रवारी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये भोजनासाठी निमंत्रित केल्या गेलेल्या ब्राझीलच्या प्रतिनिधी मंडळातील एका सदस्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: गेल्या आठवड्यात या कोरोना निदान चाचणी करवून घेतली. त्यानंतर ट्रम्प यांच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र व्हाइट हाऊस टास्क फोर्सचे प्रमुख असलेले पेन्स यांनी अद्याप कोरोना बाबतची चाचणी केली नसल्याची माहिती समोर येत आहे.
त्यामुळे आता कोरोनाचा विषाणू अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपर्यंत येऊन पोहचल्याने अमेरिकन सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: