टी ट्वेंटी वर्ल्डकप वर कोरोनाचं सावट

पुणे, २६ ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्डकप मध्ये काल मॅच झाली. अशातच आता क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्याचं पहायला मिळतंय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एडन झाम्पा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने जाम्पाची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली आहे. ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान आयसीसी विश्वचषकाच्या नवीन नियमानुसार जर एखादा खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आला. तरीही तो सामन्यात खेळू शकतो. यापूर्वी कोरोनाबाधित खेळाडूंना विलगीकरणात ठेवलं जायचं. जेव्हा खेळाडू पूर्णपणे बरा व्हायचा तेव्हा त्याला खेळण्याची परवानगी दिली जायची. पण आयसीसीने यावर्षी त्यामध्ये बदल केल्यानं कोरोनाबाधित खेळाडू देखील वर्ल्ड कप खेळू शकतो.

दोन दिवसापूर्वी आयर्लंड आणि श्रीलंका यांच्या झालेल्या मॅचमध्ये जॉर्ज डॉकरेल कोरोना बाधित झाला होता. मात्र असं असतानाही तो श्रीलंका विरुद्ध मॅच मध्ये खेळताना दिसून आला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा