मुंबई, २४ फेब्रुवरी २०२१: कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोकं वर काढल्याचे दिसत आहे. त्यात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात नव्या कोरोना व्हायरस चे दोन नवे वेगवेगळे स्ट्रेन आढळून आले आहेत. ज्यामधे ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील मधील कोरोनाचा समावेश आहे.
एक N440 K आणि दुसरा E484 K आहे. तसे दोन्ही प्रकार महाराष्ट्रा बरोबरच केरळ आणि तेलंगणामधेही आढळून आले आहेत. दरम्यान देशात ब्रिटनम मधील नव्या कोरोनाच १८७ रुग्ण आढळले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेतील कोरोना संसर्ग ६ जणांना झाला आहे. तर एका व्यक्तीला ब्राझील मधील कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
तर राज्यात मंगळवारी नवीन कोरोना रूग्णांची संख्या ६,२१८ वर गेली.ज्या मधे ५१ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या २१,१२,३१२ झाली आहे.तर आतापर्यंत ५१,८५७ जणांचा मृत्यू झाला आहे.आतापर्यंत बरे झालेले रूग्ण २०,०५,८५१ इतकी आहे.तर ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ५३,४०९ वर गेली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव