मुंबई, २० फेब्रुवरी २०२१: राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा बळकटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्हामधे लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. तर वर्ध्यामधे देखील संचार बंदी करण्यात आली आहे. रूग्णालय आणि औषधांची, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद करण्यात आले आहे. तसेच ऑफलाईन शाळा, काॅलेज बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कोरोनाचा उद्रेक सध्या वाढला असुन प्रशासन सारखे नागरिकांना नियमाचे पालन करण्याचे आव्हान करत आहे. गुरुवारी हि संख्या पाच हजाराच्या पुढे गेली होती. त्यामुळे नागरिकांबरोबर सरकारची ही डोके दुखी वाढली आहे.
दिवसेंदिवस नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्याची डोकेदुखी वाढेल अशी आकडेवारी समोर आली आहे. शुक्रवारी ६,११२ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता अजून सतर्कता बाळगण्याची गरज नागरिकांना आहे.
आत्तापर्यंत एकुण २०,८७,६३२ कोरोना रूग्णांची संख्या झाली आहे. तर राज्यातील मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ५१,७१३ झाली आहे. आत्तापर्यंत कोरोना बरे होणार्या रूग्णांची संख्या १९,८९,९६३ इतकी आहे. तर राज्यातील ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ४४,७६५ झाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव