पुणे: कोरोना विषाणूच्या साथीने जगभर हाहाकार निर्माण केला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत १९,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, या प्राणघातक विषाणूमुळे, पृथ्वीवर एक सकारात्मक बदल दिसू लागला आहे, ज्याचे स्वप्न भारतासह अनेक राष्ट्रांचे होते. युरोपियन स्पेस एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातील प्रदूषण पातळीत लक्षणीय घट झाली आहे. भारत, चीन आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये वर्षानुवर्षे जमा होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरोनमुळे एक सकारात्मक मदत झाली आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगातील प्रदूषण पातळीत लक्षणीय घट झाली आहे. भारत, चीन आणि अमेरिका यासारख्या देशांमध्ये वर्षानुवर्षे या समस्यांचा सामना करत होते. अनेक उपाय योजना केल्या हजारो खर्च केले पण सध्या कोणताही उपाय न करता प्रदूषण कमी झाले आहे.
याचे कारण असे आहे की ज्या गोष्टी हे विषारी वायू बनवून वातावरण खराब करतात त्या सर्व कारखाने, थर्मल पॉवर प्लांट, पेट्रोल डिझेल वाहने या सर्व गोष्टी बंद आहेत. कोरोणाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी सर्व देशातील दळणवळण आणि उद्योगधंदे, कारखाने बंद ठेवण्यात आले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने स्वतःची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. युरोपचे हे चित्र जानेवारीत कोपर्निकस सेंटिनेल -5 पी उपग्रहाद्वारे काढले गेले होते. या विषारी वायूचा परिणाम इटलीमध्ये सर्वाधिक दिसून येतो.
तर ११ मार्च रोजी घेतलेल्या या चित्रात इटली विषारी वायूपासून मुक्त असल्याचे दिसून आले आहे. इटलीमध्ये हा बदल क्वारनटीन ठेवण्यामुळे झाला आहे. हा फोटो इतलीच्या व्हेनेशियन कालव्यांचा आहे. येथे पाण्याच्या खोलीत तरंगणारी मासे अगदी स्पष्टपणे दिसतात. क्वारनटीन केल्यामुळे या ठिकाणी बोटिंग थांबली आहे व त्याचा सकारात्मक परिणाम असा दिसून आला आहे.
अमेरिकन अंतराळ संशोधन एजन्सीने नुकतीच वुहानमध्ये नायट्रोजन डाय ऑक्साईड घटल्याचे नोंदवले आहे. शहरातील लॉकडाऊनपासून विषारी वायूमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा अंतराळ संस्थेने केला आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे आतापर्यंत १९,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४ लाखाहून अधिक लोक याचा बळी पडले आहेत. भारतातील त्याचा धोका लक्षात घेता २१ दिवसांपर्यंत सर्व पूर्णपणे बंद आहे. इटलीमध्ये सर्वाधिक ६८२० लोक मरण पावले आहेत.