कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्याचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत

पुणे, दि.३० एप्रिल २०२०: चिंचवड येथील एक कोरोनामुक्त झालेल्या दाम्पत्यांचे नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.त्या दाम्पत्याला औक्षण करून सोशल डिस्टंसिंग पाळत परिसरातील नागरिकांनी आज (गुरुवारी) दोघांचे ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत केले.

चिंचवड येथील संभाजीनगर परिसरात हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. ही महिला पुण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नर्स काही दिवसांपासून रुग्णालयातच वास्तव्याला होती. त्यामुळे १५ एप्रिल रोजी कोरोनाचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांनतर महिलेच्या पतीचेही अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

त्यामुळे या दाम्पत्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. १४ दिवसांचे उपचार घेऊन हे दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत. १४ दिवसांचे आणि त्यांनंतरचे २४ तासाचे दोनही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे दोघेही कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे या कोरोनामुक्त होऊन घरी आलेल्या या दाम्पत्यांचे संभाजीनगर परिसरातील नागरिकांनी फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. ढोल ताशाचा गजर करत आणि औक्षण करत नागरिकांनी स्वागत केले.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा