सोलापूर, दि.२० मे २०२०: शहरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. असे असतानाच एका मटण विक्रेत्याला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील मोरारजी पेठेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या ८ दिवसात त्या रुग्णाचा ३०० हुन अधिक ग्राहकांशी संपर्क आला आहे. त्यामुळे अनेक जणांना मटण खाणे महागात पडले आहे. त्यामुळे किती जणांना लागण झाली आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित रुग्णाचा मटण आणि चिकन सेंटरचा व्यवसाय आहे .शहरातील बऱ्याच व्यापाऱ्यांनी मांसाहारी सेंटर बंद केले असल्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणाहून अनेक ग्राहक मटण आणि चिकन नेण्यासाठी येत होते.
त्यामुळे प्रशासनाने दखल घेत दुकाने बंद करायला सांगितले होते, पण तरीही हा रुग्ण ग्राहकांना चिकन, मटण घरून पुरवठा करत होता.
संबंधीत रुग्णाचा ३०० हुन अधिक ग्राहकांशी संपर्क आला असल्याचे बोलण्यात येत आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्या ग्राहकांना शोधणे हे प्रशासनासमोर आव्हान असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी