मुंबई २३ जुलै २०२४ : नवनिर्वाचित आमदार युवा नेते श्री अमित गोरखे यांचा मुंबई येथे असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. महामंडळाचे मुख्य व्यवस्थापक अनिल मस्के यांच्यासह महामंडळातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आमदार अमित गोरखे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी आमदार अमित गोरखे यांनी सांगितले की, प्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली होती. आज पुन्हा समाजाचा विकास करण्यासाठी मला फडणवीस साहेबांनी संधी दिलेली असून मी समाजाचा विकास करण्यासाठी सदैव अग्रेसर राहील असे मत अमित गोरखे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनीधी : सचिन साबळे










































