सांगोलेकरांना ऑनलाइन खरेदीसाठी नगरसेतू अँप

सोलापूर, दि.५ मे २०२० : सांगोला नगरपरिषदेतर्फे शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी ऑनलाइन माल खरेदीसाठी ” नगरसेतू ” हे अँप विकसित करण्यात आले आहे. याद्वारे नागरिकांना किराणा, भाजीपाला, फळे, मेडिकल, पाण्याचे जार, दूध, चिकन/मटन या सर्व गोष्टी घरपोच मागवता येणार आहेत.

या ऍपच्या वापरामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील खरेदीसाठी होणारी गर्दी कमी होईल, अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात शहरातील व बाहेरगावाहून आलेले खरेदीदार, दुकानदार, शासकीय कर्तव्यावरील पोलिस व अन्य विभागांतील शासकीय कर्मचाऱ्यांना सतत हात धुण्यासाठी “हॅडवॉश स्टेशन’ ची निर्मिती करणारी राज्यातील पहिलीच नगरपरिषद म्हणून ओळख निर्माण केली आहे. संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यासाठी सतत फवारणीही करण्यात येते.
या अगोदरच फळे, भाजीपाला एकत्रीत न विकता सोसायटीत, घरपोच करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सध्या घरपोच विविध प्रकारचा ऑनलाइन माल मिळवण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी नगरपरिषदेने स्वतःचे नगरसेतू ऍप विकसित करण्यात आले आहे.

हे ँप वापर करण्यासाठी अगदी सोपे आहे. हे ऍप चार ते पाच स्टेप्समध्ये इंस्टॉल होते. यामध्ये “होम डिलिव्हरी’ देणाऱ्या सर्व दुकानांचा समावेश आहे. ही ऑर्डर आपण सिलेक्ट केलेल्या दुकानदारास त्यांचे मोबाईलवरील व्हाट्सअपद्वारे मिळणार आहे. सर्व दुकानदार ऑर्डर तयार करून माल घरी पाठवतील.

याशिवाय आवश्यकता असल्यास त्या दुकानदारांच्या मोबाईल नंबरवर तुम्ही त्यांना कॉल करू शकता. आपला नंबरसुद्धा त्यांच्याकडे जात असल्याने आवश्यकता पडल्यास दुकानदार आपणाला फोन करून अधिक माहिती घेऊ शकेल.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा