डोंबिवलीतील रेशन दुकानातील भ्रष्टाचार आला समोर; भाजपा आमदारांनी घातली  झडप

डोंबिवली, ३० ऑगस्ट २०२०: डोंबिवलीतील रेशन दुकानातील भ्रष्टाचार आज भाजपने समोर आणला आहे. डोंबिवली पश्चिमेतील ठाकूर वाडी येथील एका रेशन दुकानावर भ्रष्टाचार सूरू होता. सततच्या सांगण्यावरून सुद्धा या रेशन दुकानात नागरिकांना वेळेवर रेशन मिळत नव्हते त्यामुळे संतप्त नागरिकांनी याबाबतची तक्रार भाजप आमदार आणि सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना केली. त्यामुळे तक्रारीची दखल घेत आमदार यांनी या रेशन दुकानात जाऊन दुकान चालवणाऱ्या महिलेला चांगलेच सुनावले, तसेच सूरू असलेली मनमानी बंद करा असे सांगितले अथवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे खडेबोल सूनावले.

रेशन दुकान उघडण्याची वेळ ही सकाळी ८: ३० वाजता आहे मात्र तरी सुद्धा ही महिला दुपारी १२ वाजता दुकान सूरू करते त्यामुळे नागरिकांना अवेळी देखील रेशन घेण्यासाठी यावे लागत होते. त्याचप्रमाणे रेशन हे महिन्याच्या १० तारखेपर्यत दुकानात येणं हे बंधनकारक असताना देखील हे निर्णय या रेशन चालकांकडून पाळले जात नसल्याने नागरिकांना वेळेवर महिन्याचे रेशन मिळत नाही.

रेशन दुकानातील मनमानी कारभाराला आळा बसावा यासाठी नागरिकांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. रेशन चालक महिलेला खडेबोल सुनावल्यानंतर या महिलेला अखेरची सूचना देण्यात आली आहे. पुन्हा जर अशा तक्रारी आल्या तर दुकान सील केले जाईल असे ते यावेळेस म्हणालेत. त्यामुळे यापुढे योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेतच रेशन वाटप करणार असे दुकान चालवणाऱ्या महिलेने आश्वासन दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा