कोरापुटमध्ये ७ कोटी ९० लाख रुपयांच्या नकली नोटा जप्त

ओडिशा , ३ मार्च २०२१ : बस्तर येथे तैनात कोरापुट (ओडिशा) पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत ७ कोटी ९० लाख रुपयांच्या बनावट नोटासह तीन जणांना अटक केली आहे. एसपी कोरापुट वरुण गुंटापल्लीच्या म्हणण्यानुसार छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा येथील तीन जण छत्तीसगडची नोंदणी क्रमांक सीजी ०४ एस ०५४५ च्या फोर्ड फिगोमध्ये ४ सूटकेसमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटसह विशाखापट्टणमकडे जात होते. सुनकी पीएस पोलिस ठाण्याचे कर्मचारी वाहनांच्या रूटीन चेकिंग करत होते.
 
तपासणी दरम्यान वाहनात ठेवलेले चार सुटकेस उघडण्यात आले आणि त्यात ५०० रुपयांच्या बनावट नोटाचे १५८० बंडल सापडले. प्रत्येक बंडलमध्ये १०० च्या नोट्स होत्या . एवढी रक्कम मिळाल्यावर पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की  हे पैसे विशाखापट्टणमला पाठविण्यास सांगितले होते.
 
कोरापुट पोलिसांनी त्यांच्या आयडी प्रूफसह वाहन, ५ मोबाईल व काही डेबिट व क्रेडिट कार्ड जप्त केले असून त्याशिवाय ३५ हजारांची रोकड जप्त केली आहे. याबाबत पोलिस अधिक तपशिलांचा शोध घेत असून छत्तीसगड पोलिसांशी संपर्क साधून बनावट नोटा व्यवसायामध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्याची तयारीही सुरू आहे. 
 
न्युज अनकट प्रतिनिधी : एस राऊत

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा