पनवेल, २५ मे २०२३: महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रेरित शिक्षण देणाऱ्या भारतातील व राज्यातील पहिल्या विधापीठाला अंतिम मंजुरी दिली आहे. या विधापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. कर्जत येथे युनिव्हर्सल एआय विधापीठ कार्यान्वित झाल्याची माहिती खात्यातर्फे जारी अधिसूचनेद्वारे देण्यात आली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर स्पेशलइइड अभ्यासक्रम देऊ करणारे युनिव्हर्सल एआय हे भारतातील पहिले विधापीठ आहे. महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने या विधापीठाला मंजुरी दिली होती व तसे पत्र २५ जानेवारी २०२३ रोजी पाठवले होते. आता विधापीठ कार्यान्वित करण्यासाठीही सरकारने मंजुरी दिली आहे. युनिव्हर्सल एआय विधापीठांचे पहिले शैक्षणिक वर्ष १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणार आहे.
विधापीठाने महाराष्ट्रातील कर्जत येथे ग्रीन कॅम्पस तयार केला आहे. युनिव्हर्सल एआय विधापीठांचे कुलपती व संस्थापक प्राध्यापक तरुणदीप सिंग आनंद घोषणेच्या वेळी म्हणाले, २१ व्या शतकातील सार्वत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे भारतातील व महाराष्ट्रातील पहिले समर्पित एआय विधापीठ देशाच्या व राज्याच्या वाढ आणि विकासातील एक महत्त्वपूर्ण प्रेरक घटक ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर