गोल पोस्ट गेट टेक तुमचा मोबाईल नंबर १ जानेवारीपासून बदलणार… जाणून घ्या काय आहेत बदल

तुमचा मोबाईल नंबर १ जानेवारीपासून बदलणार… जाणून घ्या काय आहेत बदल

नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर २०२०: मोबाइल नंबरच्या बदलांना दूरसंचार विभागानं मान्यता दिली आहे. शासकीय मान्यतेनंतर फिक्स्ड लाइन वरून सेल्युलर मोबाईल वर डायलिंग पॅटर्नमध्ये बदल केले जातील. म्हणजे आता कोणत्याही लँडलाईनवरून सेलफोनवर कॉल करण्यापूर्वी शून्य डायल करणं अनिवार्य असंल. हा नियम १ जानेवारी २०२१ पासून लागू होईल. यामुळं आता डॉलर नंबर १० अंकां ऐवजी ११ अंकी असंल. आतापर्यंत शून्य डायल केल्याशिवाय फिक्स्ड लाइन वरुण कॉल करनं शक्य होतं. याशिवाय दूरध्वनी विभागानं दूरध्वनी कंपन्यांना दिलेल्या मोबाइल नंबरच्या मालिकेची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

आपला मोबाइल नंबर १० ऐवजी ११ अंकांचा असेल

मोबाइल नंबर डायलिंग बदलण्याचा प्रस्ताव दूरसंचार विभागानं मंजूर केलेल्या दूरसंचार नियामक मंडळानं (ट्राय) जारी केला होता. ट्रायच्या म्हणण्यानुसार, १० ऐवजी ११ अंकी मोबाइल नंबर असल्यास देशात मोबाइल नंबरची उपलब्धता वाढंल. काही दिवसांपूर्वी मोबाईल नंबरमध्ये बदल करण्याचे अनेक प्रस्ताव ट्रायनं सरकारकडं केले होते. त्यामध्ये नवीन राष्ट्रीय क्रमांकन योजनेचा समावेश होता. तसंच ट्रायनं डोंगल्ससाठी वेगळी मोबाईल नंबर मालिका देण्याची शिफारस केली असून १० ऐवजी १३ क्रमांक असण्याची सूचना देण्यात आली.

असा निर्णय सरकारनं का घेतला?

भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन मोबाइल नंबर आवश्यक आहे. त्यामुळं मोबाईल क्रमांक दहावरून ११ करण्यात यावा अशी ट्राय कडून दीर्घकाळ मागणी होती. अशी अपेक्षा आहे की, मोबाइल नंबर सिरीज १० च्या ऐवजी ११ केली असता कोटींच्या संख्येनं नवीन नंबर उपलब्ध होतील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version