गोल पोस्ट महाराष्ट्र नाशिक जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्याने सुनेला संपवले, नाशिक मधील घटना

जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्याने सुनेला संपवले, नाशिक मधील घटना

नाशिक २८ जून २०२३: लोभ हा माणसाला कुठल्या स्तराला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. लोभामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे समाजात आहेत. अशीच एकघटना नाशिकमध्ये घडली आहे. जमिनीबाबात चर्चा करायला आलेल्या चुलत सासऱ्याचे सुनेसोबत भांडण झाले. हे भांडण विकोपाला गेले आणि संतापाच्या भरात सासऱ्याने सुनेची हत्त्या केली.

नाशिकमधील सातपूर येथे सोमवारी झालेल्या हत्याकांडाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. अशोक्तीबाई शनीदयाल बैगा असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. जयकुमार परसराम बैगा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बैगा कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असुन कामानिमित्त नाशिकमध्ये राहत होते. पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

या कुटुंबीयांमध्ये गावाकडील जमिनीवरुन वाद सुरु होता. गावाकडे भांडण झाल्यानंतर बैगा कुटुंबीय नाशिकला आले. सातपूर येथील विधाते गल्लीत बैगा कुटुंबीय राहत होते. नाशिकमध्ये येऊन अवघे तीनच दिवस झाले आणि ही हत्याकांडाची घटना घडली. विशेष म्हणजे आरोपी आणि पीडित एकाच ठिकाणी राहतात. महिला आणि तिचा पती खालच्या मजल्यावर रहायचे, तर आरोपी वरच्या मजल्यावर राहायचा.

मयत महिलेचा पती कामावर गेला होता. महिला घरी एकटीच होती. यावेळी चुलत सासरा जमिनीबाबत चर्चा करायला खालच्या मजल्यावर सुनेच्या घरी गेला. चर्चा सुरू असताना सासरा आणि सुनेमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि संतपालेल्या सासऱ्याने घरातील सुरीने वार करुन सुनेची हत्या केली. यानंतर आरोपी वरच्या मजल्यावरीन आपल्या खोलीत जाऊन झोपून गेला. तीनच दिवसांपूर्वी बैगा कुटुंब तेथे रहायला आले होते. त्यामुळे त्यांची काहीच माहिती शेजाऱ्यांकडेही नव्हती. यामुळे आरोपीला पकडणे आणि हत्येचा उलगडा करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत २४ तासात प्रकरणाचा छडा लावला. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या चुलत सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अखेर आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version