कोवॅक्सिनला 24 तासांच्या आत मिळू शकते मान्यता, WHO च्या अधिकाऱ्यांचा दावा

नवी दिल्ली, 27 ऑक्टोंबर 2021: जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची तांत्रिक समिती 24 तासांच्या आत कोवॅक्सिनला आपत्कालीन वापराच्या मंजुरीची शिफारस करू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.  मार्गारेट हॅरिस यांनी पत्रकारांना सांगितले की, तांत्रिक सल्लागार गट सध्या कोरोनाव्हायरस रोग (कोविड-19) विरुद्ध भारतातील स्वदेशी बनावटीच्या लसीवरील डेटाचे पुनरावलोकन करत आहे.
“जर सर्व काही ठिक असेल आणि सर्व काही ठीक चालले असेल आणि समितीचे समाधान झाले तर आम्ही पुढील 24 तासांच्या आत शिफारसीची अपेक्षा करू,” असे न्यूज एजन्सी रॉयटर्सला हॅरिस यांनी जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
 कोट्यवधी भारतीयांनी कोवॅक्सिन घेतली आहे परंतु अनेकांना WHO ची मान्यता मिळाल्याशिवाय प्रवास करता आला नाही.
 हैदराबादस्थित औषध कंपनी भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे.  त्यांनी 19 एप्रिलपर्यंत आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) सादर केली होती, परंतु WHO ने हिरवा कंदील दाखवण्यापूर्वी कंपनीकडून अधिक डेटा आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा