कोविड -१९ विषयी दिवसभरातील पूर्ण आढावा

नवी दिल्ली, दि. १ जून २०२०: कोविड-१९ च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सोबत भारत सरकार श्रेणीबद्ध, पूर्व नियोजित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून अनेक पावले उचलत आहे. उच्च स्तरावर याविषयी नियमितपणे पुनरावलोकन आणि परीक्षण केले जात आहे.

गेल्या २४ तासात ४,८३५ रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ९१,८१८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत असून ते आता ४८.१९ % वर पोहोचले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १८ मे रोजी ३८.२९ % होते. ३ मे रोजी २६.५९ % तर १५ एप्रिल रोजी ११.४२ % होते.

आजपर्यंत सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली ९३,३२२ रुग्ण आहेत. मृत्यू दर २.८३% आहे. १८ मे रोजी मृत्यू दर ३.१५% तर ३ मे रोजी ३.२५ % होता तर १५ एप्रिल रोजी ३.३० % होता. देशात मृत्यू दर सातत्याने कमी होताना दिसत आहे. सातत्याने सर्वेक्षणावर भर, वेळेवर निदान करणे आणि रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन यामुळे तुलनेने मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.

अशा प्रकारे दोन विशिष्ट बदल लक्षात घेतले जात आहेत, एकीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना, दुसरीकडे मृत्यू दर कमी होत आहे.

४७२ शासकीय आणि २०४ खाजगी प्रयोगशाळांद्वारे (एकूण ६७६ प्रयोगशाळांद्वारे) चाचणी क्षमता वाढली आहे. यात एकत्रितपणे कोविड -१९ साठी आतापर्यंत एकूण, ३८,३७,२०७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे, तर काल १,००,१८० नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या परिस्थितीजन्य अहवाल-१३२ नुसार दिनांक ३१ मे रोजी मृत्यूची संख्या सर्वाधिक असलेल्या देशातील मृत्यूचे प्रमाण खालीलप्रमाणे आहेः

देश- एकूण मृत्यू/मृत्यू दर

जग- ३,६७,१६६/६.१९%

अमेरिका- १,०१,५५७/५.९२%

ब्रिटन – ३८,३७६/१४.०७%

इटली- ३३,३४०/१४.३३%

स्पेन- २९,०४३/१२.१२%

फ्रांस- २८,७१७/१९.३५%

ब्राझील- २७,८७८/५.९९%

बेल्जियम- ९,४५३/१६.२५%

मेक्सिको- ९,४१५/११.१३%

जर्मनी- ८,५००/४.६८%

इराण- ७,७३४/५.१९%

कॅनडा- ६,९९६/७.८०%

नेदरलँड्स- ५,९५१/१२.८७%

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा