मुंबई, दि. ७ जून २०२०: जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवला आहे. अनेक देश याच्या विळख्यात सापडलेत. जगभरात ६८,८०,३७३ रुग्ण आहेत तर ३,९८,७५४ रुग्णांचा बळी गेलाय. अशात भारतात देखील कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होताना दिसतेय व भारत ६ व्या स्थानावरुन आगेकुच करत ५ व्या स्थानी गेलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लाॅकडाऊनला अनलाॅक १ असा नवा शब्द दिला व अनेक भागामध्ये लाॅकडाऊन मधे शिथिलता दिली आहे. पण, भारतात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात २८७ मृत्यूंची तसेच ९ हाजार ९७१ नव्या कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. संपूर्ण भारतात २,४६,६२८ रुग्ण तर मृतांचा आकडा ६,९२९ वर गेला आहे.
कोरोनाने भारतात कुठे जास्त थैमान घातले असेल तर ते महाराष्ट्रात आहे.८२,९६८ कोरोना रुग्ण तर २,९६९ मृतांची नोंद आहे.तसे महारष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर हा मंदवला असून ६.६२ टक्क्यांवरुन ३.५० टक्क्यांवर आला. महाराष्ट्राबरोबर गुजरात,तमिळनाडू,दिल्ली, युपी, बिहार या राज्यांमधेही तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत ज्यामुळे कोरोनाचा उद्रेक तिथेही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
देशात भले रुग्ण २ लाखांपेक्षा जास्त आहेत पण रिकव्हरी रेट हा ४८.२७ टक्के म्हणजेच १,१४,०७३ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले तर १,१५,९४२ रुग्ण उपचार घेतायत व ४५,२४,३१७ चाचण्या झाल्या आहेत.
आजून लाॅकडाऊन टप्याटप्याने शिथिल होत आसताना लोक मात्र रस्त्यावर निर्धास्त फिरत असून प्रशासनाने घातलेल्या नियमाचा फज्जा उडल्याचे चित्र आत्ताचा घडीला अनेक भागात दिसून आले ज्यामुळे याचा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणा-या
आकडेवारीमुळे पंतप्रधानांचा अनलाॅक १ चा फाॅर्म्युला कितपत योग्य ठरेल ती येणारी वेळच ठरवेल पण या सर्वांचे चिंतन केंद्र व राज्य प्रशासनाने केले पाहिजे.
न्यूज अनकट प्रतिनिधी