पुण्याच्या मानाच्या गणेश मंडळांनी उभारले कोविड सेंटर..!

पुणे, दि. २ ऑगस्ट २०२० : शहरात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे, या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्व मानाच्या सार्वजनिक मंडळांनी महापालिकेच्या मदतीने कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सर्व गणेश मंडळाचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. हे कोविड सेंटर फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले असून ३०० बेड्स या कोविड रुग्णालयात उभारण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी सामाजिक भावना जपत महागरपालिकेला यात सहकार्य केले आहे.

या कोविड सेंटर उभारणीत ग्रामदैवत कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती, केसरी गणपती, भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती आणि दगडूशेठ हलवाई गणपती या गणेशोत्सव मंडळांचा यात सहभाग आहे. या गणेश मंडळांनी कोविड सेंटर उभारून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा