मुंबईत कोव्हिडशील्ड लसीच्या चाचणीला सुरुवात, पहिल्यांदाच प्लॅसिबो’चं होणार परीक्षण

मुंबई, २६ सप्टेंबर २०२०: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे संशोधन केलेली लस कोव्हिडशील्ड जी पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे या लसीचं मानवी परीक्षण मुंबईत सुरू झालंय. या लसीची परीक्षण प्रक्रिया सुरू झाली असून शनिवारी तीन लोकांवर लसीचं परीक्षण केलं जाणार आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी सांगितलं.

ज्या तीन व्यक्तींवर या लसीचं परीक्षण केलं जाणार आहे, त्यातील एका व्यक्तीवर प्लेसीबो परीक्षण केलं जाणार आहे. म्हणजेच यातील दोन व्यक्तींना लस देण्यात येणार आहे तर एका व्यक्तीला लसी च्या रूपात साधारण द्रव्य दिलं जाईल. याचं कारण असं की, रुग्णाच्या मानसिकतेचा देखील या रोगावर काही सकारात्मक परिणाम होतोय का याचा अभ्यास केला जातो. असं प्लॅसिबो परीक्षण करणारं केईएम हे पहिलं रुग्णालय ठरणार आहे, जिथं सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित कोव्हिडशील्ड लसीचं मानवी परीक्षण केलं जाणार आहे.

“आम्ही आतापर्यंत १३ लोकांवर स्क्रीनिंग केली आहे. यामध्ये १० लोकांची स्क्रीनिंग पूर्ण झाली आहे”, असं रुग्णालयाच्या डीन देशमुख यांनी सांगितले.

पीजीआय चंदीगडमध्येही कोरोना लसीची ट्रायल

पीजीआय चंदीगडमध्येही कोरोना लसीच्या शेवटच्या टप्प्यातील ट्रायल प्रक्रिया सुरु आहे. देशात या लसीच्या ट्रायलसाठी १७ संस्था एकत्र आल्या आहेत. पीजीआयचाही यामध्ये समावेश आहे.

डाटा सेफ्टी अँड मॉनिटरिंग बोर्ड नवी दिल्लीवरुन परवानगी मिळाल्यानंतर पीजीआयमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण प्रक्रिया सुरु झाली आहे. ट्रायलसाठी पीजीआयमध्ये १० स्वयंसेवकांची निवड केली आहे. सर्वांची तपासणी केली आहे. हे सर्व जण ट्रायलसाठी फिट असल्याचं स्पष्ट झालंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा