लॉकडाऊनच्या काळात “गांधी कट” ची क्रेझ

पुणे, दि.२७ एप्रिल २०२० : सध्या कोरोनामुळे देभशरात सुरु असलेल्या लॉकडाऊनला एक महिना उलटून गेला. फक्त अत्यावश्यक सेवेखेरीस सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यात महिनाभरापासून केस कर्तनाल्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे आता लॉकडाऊन उघडण्याची वाट न बघता वाढलेल्या केसांना आता पुरुष मंडळींनी आता गांधीकटचा पर्याय निवडला असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामध्ये वाढलेल्या केसांचा अधिक त्रास होत आहे. काहींना घामोळ्या किंवा त्वचाविकार होत असल्यामुळे  केस घरच्या घरी कमी करणे किंवा टक्कल करणे हाच पर्याय उरला आहे.

लॉकडाऊन संपल्यानंतरही लगेचच सलून उघडण्यात येणार नाही. कारण सलूनमधून कोरोनाचा जास्त प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे,असे मेसेज सध्या सोशल मिडियावर चांगलाच फिरत आहेत. त्यामुळे नागरिक ईलेक्टॉनिक मशीनच्या सहाय्याने घरच्या घरी डोक्यावरचे केस काढत असताना दिसत आहेत.

एरवी आपण केस कर्तनालयाचा दुकानांमध्ये जाऊन नवीन हेअर स्टाइल करतो. मात्र आता लॉक डाऊन असल्यामुळे तरुणाई देखील टक्कल करणे पसंत करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये घराबाहेरच पडायचे नाही तर मग अनेकजण कबीर सिंग होण्यापेक्षा गांधीकट केलेला बरा म्हणून आपले फोटो स्टेटसवर ठेवताना दिसत आहे.

सध्या सोशल मिडियावर अनेक केस व दाढी वाढलेल्या मित्र परिवारांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ये दाढी क्यू बढाई है, कोई मन्नत है क्या, एक महिना झालं सलून बंद आहे. तसेच डोक्यावरचे केस कमी करताना ब्युटी पार्लरचा कोर्स लॉकडाऊनमध्ये कामाला आला असे काही जोक्स फिरताना दिसत आहे.

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुढील काही दिवस घरातून बाहेर पडायचे नाही. या कालावधीत केसांची वाढ होईलच त्यामुळे तरूणाईसह मध्यम वयाचे नागरिकही टक्कल करणे पसंत करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा