क्रिकेट जगतातील अष्टपैलू व्यक्तिमत्व कपिल देव

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांचा आज ६१ वा वाढदिवस.कपिल देव यांच्या करकीर्दीतच भारताने १९८३सालचा विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी त्यांच्या कर्णधार पदाची जगभर चर्चा झाली होती. त्यांच्यामुळेच आज क्रिकेट विश्वात भारताचे नाव जगभरात पोहचण्यास मदत झाली.

चंदिगडमध्ये जन्मलेल्या कपिल यांचे प्राथमिक शिक्षण डी.ए.वी. शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सेंट एडवर्ड कॉलेजमध्ये झाले.
कपिल यांनी १९७५ मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात करून पहिला सामना हरियाणा संघाकडून खेळत त्यात त्यांनी ६ बळी घेतले आणि पंजाब संघाला ६३ धावांत डाव गुंडाळायला भाग पाडला. या मोसमातच कपिल यांनी ३० सामने खेळत १२१ विकेट घेतल्या. त्यानंतर त्यांनी फर्स्ट क्लास आणि रणजी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
कपिल यांचं १ऑक्टोबर १९७८ मध्ये पाकिस्तान विरोधात वन डे मध्ये, तर १६ ऑक्टोबरला पाकविरोधातच कसोटी पदार्पणही झालं.
वन डे आणि कसोटीचा एकत्रित विचार करता कपिल यांनी जवळपास ७०० विकेट मिळवल्या आहे. तर ९ हजारांहून अधिक धावाही त्यांनीं केल्या आहेत.
कपिल देव यांना १९७९ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८३ मध्ये विज्डन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार, २००२ मध्ये विज्डन इंडियन प्लेयर ऑफ द सेंच्युरी पुरस्कार, २०१० मध्ये आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ द फेममध्ये कपिल यांचा समावेश, २००८ मध्ये भारतीय लष्कराकडून टेरिटोरीयल आर्मीचे लेफ्टनंट कर्नल हे पद देऊन गौरव याव्यतिरिक्तही कपिल यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत.
१९८० मध्ये कपिल देव यांचा विवाह रोमी भाटिया यांच्याशी झाला. त्यांना अमिया नावाची एक कन्यादेखील आहे.
फलंदाजी, गोलंदाजी क्षेत्ररक्षण याद्वारे क्रिकेटच्या मैदानावर अधिराज्य गाजवणाऱ्या कपिल देव यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा