माळेगावात मेडिकल दुकानदारावर गुन्हा

7

माळेगाव, ७ ऑक्टोबर २०२०: मेडिकल दुकानासमोर लावलेला भाजीपाल्याचा गाडा फेकून देत शिविगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी माळेगाव येथील दोघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप बाळासो आढाव यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे .दत्तात्रय मारुती झगडे व विनायक दत्तात्रय झगडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. १ शनिवार सकाळी साडेआठ वाजता माळेगावातील जुन्या बस स्थानकाजवळ ही घटना घडली. आढावा याचे वडील येथे भाजी विक्रीचा गाडा लावतात. आरोपींनी त्यांच्या जवळ येऊन तुमच्या भाजीच्या गाड्यामुळे आमच्या मेडिकल दुकानाकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना खुप त्रास होतो आहे असे म्हणत त्यांच्या गाड्यावरील फळे, भाजीपाला रस्त्यावर फेकून देत शिविगाळ, दमदाटी केली.

तक्रादरदार या विषयी विचारण्यासाठी मेडिकल दुकानात गेले असताना आरोपींना त्यांना देखील हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी सत्तूर उलटा करत मारला व तक्रादरदाराच्या खिशातील दहा हजार रुपये तसेच त्यांच्या वहिनीच्या कानातील सहा ग्रॅमचे सोन्याचे जोड काढून घेतले असल्याचे तक्रारीत आढावा यांनी म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा