हडपसर, दि. २० जून २०२०: लॉक डाऊनच्या काळात हडपसर मध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. गंभीर व किरकोळ प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. खून मारा-माऱ्या विनयभंग फसवणूक आदी या प्रकारचे गुन्हे सरस घडत असल्याने सामान्य नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.
लॉकडाऊन काळात हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत चार -पाच खून झाले. तसेच हाणामारीच्या घटना सतत घडत आहेत. भिमाले हाईट्स मध्ये एकाच सोसायटी मध्ये राहणारे संदिप कोरडे व बबलू कोरडे, दिनेश आडते, गणेश कोरडे यांच्यातील भांडणाच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली त्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. संदीप कोरडे यांना बबलू कोरडे, गणेश करोडे यांनी मारहाण केली असल्याची तक्रार हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केल्यानंतर हडपसर परिसरात विविध ठिकाणी गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांची रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी गस्त वाढवावी व वाढती गुन्हेगारी वेळीच मोडीत काढावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे