कर्जत, ३ ऑगस्ट २०२०: कर्जत राशीन रस्त्यावर अक्काबाई मंदिरा समोर नेमक्या वळणावर गेली दोन महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवला असून गटारीचा मैला मिश्रीत पाणी रस्त्यावरून वाहत असून लोकांना दुर्गंधीने रोगराईस सामोरे जावे लागत असून खांंदलेल्या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची वाट नगर पंचायत पाहत आहे का? असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्या पुजाताई म्हेत्रे यांनी उपस्थित केला आहे.
गेली दोन महिन्यापासून गटारीचे मैला मिश्रित पाणी रस्त्यावरून वाहत असून याची वारंवार तक्रार करूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. आठ पंधरा दिवसातुन एकदा कधीतरी येथे दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र त्यात यश मिळत नाही. त्यासाठी या रस्त्यावर गेली अनेक दिवसापासून मोठा खड्डा खणलेला तसाच असून रोडला पडलेल्या आडव्या चारीमुळे मोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे, याठिकाणी राशिनहून येणारा रस्ता हा उताराचा असून नेमक्या वळणावरच खड्डा असल्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे नगर पंचायत याठिकाणी मोठा अपघात होण्याची वाट पाहते आहे का ? असा प्रश्न विरोधी पक्ष नेत्या सौ पूजा म्हेत्रे यांनी उपस्थित केला असून मैला मिश्रीत घाणपाणी रस्त्यावरून वाहत आहे.
त्यामुळे दुर्गंधी सुटली असून डास उत्पन्न होऊन इतर आजारांनाच निमंत्रण दिले जात आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे असे आवाहन म्हेत्रे यांनी केले आहे. यावेळी माजी उपसरपंच संतोष म्हेत्रे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष