ई पास रद्द होताच तुळजाभवानी मंदिरात भक्तांची गर्दी

5

तुळजापूर, ८ सप्टेंबर २०२० : कोरोनाचा वाढता प्रभाव सर्वत्र वाढत आहे परंतू शासनाने जिल्हाबंदी उठवल्याने दैनंदिन वर्दळ वाढली असून अंतर जिल्हा एसटी सुरू झाल्याने तसेच ई पासची अट रद्द केल्याने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मात्र मंदिर बंद असल्याने भाविकांना महाद्वारातूनच शिखर दर्शन घेवून समाधान मानावे लागत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाने महाद्वार परिसरात जागोजागी सैनिटायझर आणि हैन्डवॉशची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच महाद्वार परिसरात वेळोवेळी फवारणी करावी असे मत भाविकांनी व्यक्त केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्च पासून श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

संपूर्ण देशात लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केल्यानंतर तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यास येणा-या भक्तांची संख्या शुन्यावर आली होती परंतू राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने अनलॉकची घोषणा केल्याने हळूहळू भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे यामुळे तुळजापूर नगरी पुन्हा गजबजू लागली आहे त्यामुळे व्यापारी बंधू व पुजा-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा