रेल्वेतील ‘ड’ श्रेणीच्या नोकरीसाठी उच्चशिक्षितांची गर्दी; देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीची समस्या

पुणे, १८ जानेवारी २०२३ : देशात बेरोजगारीची समस्या किती मोठ्या प्रमाणात आहे, याचा प्रत्यय नागपुरातील मोतीबाग फुटबॉल मैदनावर आला. ‘ड’ श्रेणीतील नोकरभरतीसाठी उच्चशिक्षित तरुण-तरुणी मोठ्या संख्येने नोकरभरतीसाठी आले आहेत. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत ‘ग्रुप डी’करिता भरती प्रक्रिया नागपुरातील मोतीबाग येथील फुटबॉल मैदानावर सोमवारपासून (ता. १६) सुरू झाली.

तीन वर्षांपूर्वी रेल्वे भरती मंडळाने लेखी परीक्षा घेतली होती. उत्तीर्ण उमेदवाराची शारीरिक क्षमता चाचणी आता २०२३ मध्ये घेतली जात आहे. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ८०० ते १००० उमेदवार नागपुरात पोचले आहेत. परीक्षा पारदर्शक होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया दोन ते तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. भरती केंद्रावर बाहेरील कोणीही व्यक्ती आत जाऊ शकणार नाही, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उमेदवारांसाठी मोतीबाग येथील क्रीडा भवनात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा