बीड, दि. २ जुलै २०२०: कोरोनव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्रातील बीड शहरात आठ दिवसांसाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा चालविण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
आदेशानुसार ९ जुलै मध्यरात्रीपर्यंत कर्फ्यू लागू राहील.
“या कालावधीत कोणालाही शहराबाहेर जाऊ किंवा घराबाहेर पडू दिले जाणार नाही. वैद्यकीय सेवा कार्यरत राहतील. आपत्कालीन सेवा चालविण्यास परवानगी देण्यात येईल, परंतु इतर सर्व खासगी व सरकारी कार्यालये या काळात बंद राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे. आपत्कालीन सेवांमध्ये काम करणा-या पासधारकांना शहरात फिरण्याची परवानगी देण्यात येईल, असे ते म्हणाले.
बुधवारपर्यंत बीड जिल्ह्यात १३१ कोविड -१९ रूग्ण झाले असून या आजारामुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तेथे १० सक्रिय रुग्ण आढळले, तर ११५ रूग्णांना बरे झाल्यावर त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी