वाघोलीतील कर्फ्यू संपला, वाघोलीतील नागरिकांनो नियम पाळा…!

वाघोली, दि.१८ सप्टेंबर २०२०: वाघोली गावांमध्ये जनता कर्फ्यू चांगल्या प्रकारे नागरिकांनी पाळला असून कर्फ्यू संपल्यानंतर प्रशासन व नागरिकांची जबाबदारी चालू झाली आहे. जनता कर्फ्यू झाल्यानंतर लोकांनी पूर्वीसारखे प्रशासनाला सहकार्य करावे व घराबाहेर जाताना मस्क घालूनच घराबाहेर यावे. आणि जोपर्यंत कोरोना संसर्ग कमी होत नाही तोपर्यंत सर्व नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे. प्रत्येक ग्रामस्थाने इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर करावा आणि जर कोणी नियम पाळत नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई प्रशासनाला कारवाई लागणार आहे.

असे केले तरच आपण वाघोली गावांमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यास मदत होईल. यासाठी प्रशासन, ग्रामस्थ, दुकानदार, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, व इतर व्यावसायिक यांनी कोरोना विरोधात लढा देणे गरजेचे आहे. तरच वाघोलीत वाढत चाललेल्या रुग्णांची आकडेवारी कमी होईल व इतरांसाठी वाघोली गाव एक आदर्श गाव तयार होईल असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा