सायबर गुन्हेगारी आणि महाराष्ट्र सायबर सेल

पुणे २४ जून २०२३: सध्याच्या काळात इंटरनेटवरच्या गुन्ह्यांमध्ये म्हणजेच सायबर गुन्हेगारी संदर्भात खूप मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. स्मार्टफोन मुळे इंटरनेटचा वापर वाढला असल्याने सायबर क्राईम च्या प्रमाणातही वाढ होत आहे. इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे,लहान मुलं या प्रकाराला सतत बळी पडतात, त्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न मोठा झाला आहे. कळत- नकळत आपली किती फसवणूक होऊ शकते याचा काही अंदाजही नसतो. इंटरनेट गेमिंग असेल किंवा सोशल नेटवर्किंग यांकडे पॅसिव्ह इन्कम साठी आजकाल अनेक जण बघतात. पण त्यामध्येही आता फसवणूकीचा धोका जास्त वाढला आहे. वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया वरून अधिकृत लिंक्स वरूनच गेम डाऊनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत असतो. त्यादरम्यान काही फसवणूक झाल्यास महाराष्ट्र सायबर सेलने 1930 किंवा cybercrime.gov.in या पोर्टल वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

सायबर क्राइमची तक्रार करण्यासाठी हे पोर्टल देशातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यामार्फत तक्रार केल्यास पोलीस स्टेशन च्या फेऱ्या माराव्या लागत नाही. यात ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. याची सर्व माहिती ऑनलाइन मिळते. आपली ओळख पण गुप्त ठेवली जाते. ही वेबसाइट इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या वेबसाइटवर जाण्यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करावे. या वेबसाइटवर पोर्टलशी संबंधीत सर्व माहिती भरा. या वेबसाइटमध्ये रिपोर्ट हा, सायबर क्राइम रिलेटेड टू महिला-लहान मुले आणि सायबर क्राइमचे असे दोन भाग केलेले आहेत. युजर्सला कशात तक्रार करायची असेल त्यावर क्लिक करायचे. सायबर क्राइम अंतर्गत धोका, फिशिंग, हॅकिंग, आणि फ्रॉड यासारखे मुद्दे येतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, नावासह सर्व माहिती विचारली जाईल.

सायबर क्राइम रिलेटेड महिला-लहान मुलांपासून ते ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन गेमिंग, पोर्नोग्राफी आणि sexual exploitation येतात. यात जो विषय असेल त्यात तक्रार करावी, तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत तक्रार करता त्या ठिकाणी आरोपीचे नाव, ठिकाण आणि पुरावा मागितला जातो. सर्व आवश्यक माहितीची नोंद केल्यानंतर तक्रार सबमिट करता येऊ शकते. ज्यावेळी तुम्ही सायबर क्राइम रिपोर्ट करता त्यानंतर तुम्हाल तक्रार आयडी दिला जातो, हा एक युनिक नंबर असतो. या तक्रारीचा फॉलोअप या नंबरवरून घेतला जातो. तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा स्टेट्स जाणून घेण्यासाठी, त्याला आयडी टाकुन ट्रॅक करावे लागते.

सोशल नेटवर्किंगचा दुरुपयोग करणा-या घटनांचे प्रमाण वाढले असून तरुणांमध्ये हा प्रकार अधिक आढळून येत आहे. सायबर क्राइमचे करणाऱ्यांचे जाळे वाढत असून, सर्व वयोगटातील लोकांना याचा फटका बसत आहे. जेव्हा इंटरनेट विकसित होत होते, तेंव्हा कदाचित त्या निर्मात्यांपैकी कोणालाही असे माहित नसेल की भविष्यात या इंटरनेटचा गैरवापर होऊ शकेल, जेथे इंटरनेट किंवा सायबर स्पेस आहे तिथे सायबर क्राइम आहे, आणि सायबर क्राइम दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यांसाठी या सायबर गुन्ह्यांविषयी माहिती असणे फार महत्वाचे आहे.

सायबर क्राइम म्हणजे काय?
सायबर क्राइम हा गुन्ह्याचा एक प्रकार आहे. सायबर क्राइम हा असा गुन्हा आहे ज्यामध्ये मोबाईल, संगणक आणि इंटनेट चा समावेश असतो. जेव्हा एखादा गुन्हा इंटरनेटवर किंवा इंटरनेटद्वारे होतो तेव्हा त्याला सायबर गुन्हे म्हणतात. कोणताही मोबाईल, संगणक एखाद्या गुन्हेगारी ठिकाणी आढळतो, किंवा मोबाईल, संगणकासह एखादा गुन्हा केल्यास त्याला सायबर गुन्हे असे म्हणतात, जसे की ईमेल स्पॅम, फिशिंग, व्यक्तिगत, डेटा चोरी, हॅकिंग.

सायबर गुन्हेगारीचे प्रकार कोणते?
पहिला प्रकार म्हणजे हॅकिंग- या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये हॅकर्स प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करतात. परवानगीशिवाय इतरांच्या वैयक्तिक आणि संवेदनशील माहितीचे हे प्रतिबंधित क्षेत्र एखाद्याचे वैयक्तिक संगणक, मोबाईल किंवा कोणतेही खाते ऑनलाइन असू शकते. आपल्या सिस्टम फंक्शन जसे की संगणक नेटवर्क सर्व्हर इ. मध्ये एखादी कमकुवतपणा आढळली, किंवा त्यानुसार सिस्टममध्ये बदल करुन डेटा चोरी किंवा डेटा नष्ट केला जातो किंवा ते बदलते या प्रक्रियेस हॅकिंग असे म्हणतात. जी व्यक्ती ही प्रक्रिया करते त्याला हॅकर असे म्हणले जाते. हॅकिंग एक नकारात्मक शब्द आहे.

हॅकिंगचे दोन प्रकार आहेत. प्रथम म्हणजे एथिकल हॅकिंग, एथिकल हॅकिंग हे एका योग्य हेतूने केले जाते. अशा हॅकिंगला व्हाईट हेट हॅकिंग देखील बोलतात, नैतिक हॅकिंगमध्ये कोणताही डेटा चोरीला किंवा नष्ट केला जात नाही किंवा बदलला जाऊ शकत नाही, एथिकल हॅकिंग पूर्णपणे कायदेशीर आहे आणि लोकांना संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी केले जाते. हॅकिंगची दुसरी बाजू म्हणजे द्वेषयुक्त हॅकिंग. हे हॅकिंग चुकीच्या हेतूने केले जाते. या प्रकारच्या हॅकिंगमध्ये आपला डेटा चोरी आणि नष्ट देखील होऊ शकतो किंवा वापरलाही जाऊ शकतो, किंवा चुकीच्या उद्देशाने केले जाऊ शकते, अशा हॅकिंग ला ब्लॅक हॅट हॅकिंग म्हणतात. उदाहरणार्थ आपले ईमेल खाते हॅक करण्यासाठी किंवा सोशल मीडिया अकाउंट चे खाते हॅक करण्यासाठी, तसेच बँक खाते हॅक करणे, पैसे चोरणे हे ब्लॅक हॅट हॅकिंग मध्ये केले जाते.

राज्यात होणा-या सायबर गुन्हेविषयी आता महाराष्ट्र सायबर सेल जनजागृती करताना दिसत आहे. इंटरनेट सुरक्षेबाबत आज सातत्यानं बोललं जात असलं, तरी भारतीय तरुण त्याबाबत आजही जागरुक नसल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जागरूकतेचं प्रमाण काहीसं वाढलं आहे. पण ते पुरेसं नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशातले ५२ टक्के तरुण इंटरनेट सुरक्षेची विशेष काळजी घेत नसल्याची बाब समोर आली आहे. सायबर गुन्हे सुरक्षितता म्हणून सर्वात प्रथम इंटरनेटवरची नैतिकता, कोणता फोटो सोशल मीडिया माध्यमावर टाकावा याची काळजी घ्यावी. बँक खात्यात रक्कम आलीय किंवा लॉटरी लागली असे मेसेज पाठवले जातात. तो उघडताच जो OTP येईल, तो आम्हाला कळवा, म्हणजे तुमचे नाव आमच्याकडे नोंदले जाईल,अशा प्रकारच्या खोट्या संदेशापासून सावध रहा.

न्यूज अनकट प्रतिनिधी- वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा