सायबर हल्ल्यांच्या युगात एथिकल हॅकर्सना ‘सोनेरी दिवस’

सायबर हल्ले आणि डेटा चोरीच्या वाढत्या धोक्यामुळे आज जगभरात एथिकल हॅकर्स ची मागणी प्रचंड वाढली आहे. हे हॅकर्स कंपन्यांच्या परवानगीने त्यांच्या सिस्टीममधील त्रुटी शोधून दुरुस्त करतात, ज्यामुळे संवेदनशील माहिती सुरक्षित राहते.

करिअरच्या दृष्टीने, या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. आईआयटी खरगपूर च्या ऑनलाइन कोर्समध्ये ४५,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच, सिस्को अकादमीच्या ७० तासांच्या मोफत कोर्सला ६ लाखांहून अधिक विद्यार्थी पसंती देत आहेत. एथिकल हॅकिंग म्हणजे कायदेशीर आणि नैतिक मार्गाने सुरक्षा मजबूत करण्याची प्रक्रिया, ज्यामुळे कंपन्या सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहू शकतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे