वेगाने वाढणारे चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ महाराष्ट्रात, मुंबईसह कोकण सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

मुंबई, ६ जून २०२३: मान्सूनपूर्वी वादळ महाराष्ट्रात धडकणार आहे. येत्या २४ ते ४८ तासांत हे चक्रीवादळ मुंबई आणि कोकणच्या सागरी किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या आग्नेयेला कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ‘ बिपरजॉय ’ नावाचे हे चक्रीवादळ तयार झाले आहे. भारतीय हवामान खात्याच्या तज्ज्ञांच्या मते, येत्या २४ तासांत या वादळाची स्थिती आणि दिशा स्पष्ट होईल. हवामान खात्याच्या मुंबई शाखेच्या वतीने ट्विट करून या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे .

या चक्रीवादळाचे केंद्र समुद्राच्या खोलवर असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जास्तं पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या २४ तासांत हे वादळ उत्तरेकडे सरकणार आहे. सध्या ते मुंबईपासून ११२० किमी, गुजरातमधील पोरबंदरपासून ११६० किमी आणि गोव्यापासून ९२० किमी अंतरावर आहे. आज सकाळच्या परिस्थितीचा अंदाज घेत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे शाखेचे प्रमुख कृष्णानंद एस होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

गेल्या तीन तासांपासून हे वादळ ताशी ११ किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. उत्तरेकडे सरकणाऱ्या या वादळाचा वेग हळूहळू वाढू लागेल. पुढील १२ तासांत तो आपला वेग वाढवेल आणि ताशी ४०-५० ते ६० किलोमीटरच्या वेगाला स्पर्श करेल. मात्र या चक्रीवादळाचे केंद्र खोल समुद्रात असल्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जास्तं पाऊस पडण्याची शक्यता नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा