‘सितरंग’ चक्रीवादळ : एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू

कोलकता, २५ ऑक्टोबर २०२२: सोमवारी ‘सितरंग’ चक्रीवादळाने बांगलादेशच्या काही भागात अक्षरशः थैमान घातले आहे. विटांचे रेलिंग आणि झाडे पडल्याने एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह सात जणांना जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकसान झाल्यानंतर अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणाने एक मॉनिटरिंग सेल तयार केला होता. बांगलादेशातील भीषण वादळामुळे ढाका, नागलकोट आणि भोला आणि नरेलमधील लोहाग्रा येथे काही ठिकाणी अपघात झाले, असल्याचे समोर आले आहे.

तर, ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, कॉक्स बाजार किनार्‍यावरून किमान २८,१५५ लोक आणि २,७३६ गुरांची सुटका करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चक्रीवादळ निवारे हलवण्यात आले, तर सितरंग’ चक्रीवादळ बांगलादेशकडे सरकत असल्याने ५७६ निवारे तयार करण्यात आले आहेत.

‘या’ राज्यात ‘रेड अलर्ट’

‘सितरंग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सोमवारी आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर अधिकाऱ्यांनी सांगितले की, हैलाकांडी, करीमगंज, कचार, दिमा हासाओ, पूर्व आणि पश्चिम कार्बी आंगलाँग, मोरीगाव, नागाव, कामरूप मेट्रो, कामरूप, गोलपारा, गोलाघाट, जोरहाट आणि शिवसागर जिल्ह्याच्या काही भागात २६ ऑक्टोबरपर्यंत गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा