नाशिक : एकलहरा रोडवरील संभाजीनगर परिसरातील भोरमळा येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ३ वर्षांच्या चिमुरड्यासह आई-वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.
स्फोटाची दाहकता एवढी भयानक होती की, कुटुंबातील सर्वच व्यक्ती गंभीररित्या होरपळले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ वर्षांचा अथर्व, आई नम्रता कांबळे (वय-४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काल, मंगळवारी(दि.१९) रोजी पती नरसिंग कांबळे (वय-४४) यांचाचीही प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.