उस्मानाबाद, ६ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद येथील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड अजित खोत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, उस्मानाबाद विभागात टेंडर तसेच कामात महा घोटाळा सुरू असल्याचा आरोप केला आहे.
डीपी जळाला तर शेतकऱ्यांना तो स्व:खर्च करून नीट करावा लागतो. मात्र, दुसरीकडे अधिकारी व गुत्तेदार हे राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते यांना ठेके देऊन डी पी दुरूस्ती नावाखाली टेंडरच्या माध्यमातून नागरिकांच्या पैशाची लूट करत आहेत. या प्रकरणात, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे आम आदमी पार्टी उस्मानाबादच्या वतीने संबंधित ठेकेदारांच्या कामांच्या चौकशा कराव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे.
तसेच, अॅड अजित खोत यांनी या प्रकरणात संबंधित चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष यांना दिला आहे.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड