दबंगचे संगीतकार वाजिद खान यांचे निधन

मुंबई , दि.१ जून २०२०: हिंदी चित्रपट क्षेत्रातील ज्या जोडीने प्रेक्षकांना आपल्या संगीताच्या जादूने मंत्रमुग्ध केले. ती जोडी म्हणजे साजिद वाजिद. त्यापैकी वाजिद यांचे किडनीच्या इन्फेक्शनमुळे मुंबईत रात्री उशिरा निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मागच्या महिन्यातच बॉलिवूडने दोन मोठया कलाकारांना गमावले. आता हा बॉलिवूडला तिसरा धक्का आहे.
साजिद वाजिद यांनी अनेक चित्रपटांना सदाबहार संगीत दिले आहे. त्यात, प्यार किया तो डरना क्या, दबंग, राऊडी राठोड, दबंग २, दबंग ३, एक था टायगर, पार्टनर, वॉन्टेड, तुमको ना भूल पाएंगे यांसारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिले होते.

गेल्या काही दिवसांपासून वाजिद खान यांच्यावर चेंबूर येथील सुराणा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, अशी माहिती संगीतकार सलीम मर्चंट यांनी दिली. वाजिद यांना आरोग्याच्या खूप समस्या होत्या. किडनीची समस्या होती. यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या ४ दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, असे मर्चंट यांनी पीटीआयला दिलेल्या वृत्तात सांगितले आहे.

साजिद-वाजिद या जोडीने १९९८ मध्ये सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या मधून आपल्या करियरला सुरुवात केली होती.
वाजिद यांनी सलमानसाठी मेरा ही जलवा, फेव्हिकॉल से ही गाणी गायली होती. तर अक्षय कुमारसाठी चिंता ता चिता चिता हे गाणे गायले होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा