“डॅडी” ची जन्मठेप कायम

मुंबई : शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. यात कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे. असे वृत्त समोर आले आहे.

याप्रकरणात एकूण ११ आरोपी असून यात अरुण गवळी आणि इतर आरोपींना या खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात सर्व दोषींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

यावरची तीन महिन्यापूर्वी सुनावणी पूर्ण झाली होती. या प्रकरणाचा आज न्यायालयाने निकाल दिला आहे. यावेळी अरुण गवळीची जन्मठेप न्यायालयाने कायम ठेवत असल्याचे म्हटले आहे. मोक्का कायदा या खटल्यात लावण्यात आला होता. काहींवरील मोक्का न्यायालयाने हटवला आहे.

सध्या अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा