नवी दिल्ली (वृत्त संस्था) : आफ्रिका खंडातील माली देशाच्या ईशान्य भागात एका लष्करी चौकीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५३ सैनिक ठार झाले आहेत. मालीमध्ये अलीकडच्या काळात इस्लामी अतिरेक्यांनी केलेला हा सर्वांत मोठा हल्ला ठरला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
नायगरच्या सीमेला लागून असलेल्या मेनाका प्रांतात भूसुरुंगाच्या स्फोटात एक नागरिकही ठार झाला आहे, असे मालीचे जनसंपर्कमंत्री याया संगारे यांनी सांगितले.
परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून, शोध तसेच मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. लष्करी चौकीजवळ १० जण जखमी अवस्थेत आढळून आले आहेत, असे संगारे यांनी सांगितले. माली सरकारने जारी केलेल्या निवेदनात हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.