गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा पाऊस व वादळी वा-याने तुळजापुर तालुक्यात ऊस पिकांचे नुकसान

पाऊस व वादळी वा-याने तुळजापुर तालुक्यात ऊस पिकांचे नुकसान

तुळजापूर, ८ सप्टेंबर २०२० : गेल्या २ दिवसात रात्री पडलेल्या जोरदार पावसाने तुळजापूर व परिसराला चांगलेच झोडपून काढले आहे. पाऊस व वादळी वा-यामुळे उभ्या ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले अाहे.

नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी, अणदूर ,तामलवाडी,तामलवाडी,माळुंब्रा,तुळजापूर शहर व तालुक्यातील काही गावातील ऊसांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे हजारो एकर ऊस आडवा पडल्याने शेतकरी चिंतेत पडलेले आहे.

ऊसाचे पंचनामे करण्याची मागणी

चिवरी येथील काळदाते, व्हगाडे यांच्या १० एकर सह चिवरी मधील जवळपास ४० एकर क्षेत्रातील ऊस भुईसपाट झाला आहे. यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने पावसामुळे भुईसपाट झालेल्या ऊसाचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version